1) मापन

उद्देश = वेगवेगळ्या वस्तूची मापेघेण्यास शिकणे व त्याचा उपयोग शिकणे

साधने =1] फुट पट्टी , 2] मेजर टेप ; 3] व्हनियर कॅलिबर 4] स्कगेज

अनुमान = आपणास प्रत्येक ठीकणी मापणाची गरज असते

2) प्लायवूडला सनमायक बसवणे

उद्देश = प्लायवूडला सनमायक बसवण्यास शिकणे

साहित्य = 1] प्लायवूड 2] सनमायक 3] फेविकॉल 4] चिकट पट्टी

साधने = सनमायक कटर

अनुमान = सनमायकचा उपयोग अनेक ठिकाणी पाहायला मिळतो

3) लेथ मशीनवर टनिग व बोअरिग करणे

उद्देश= लेथ मशीनची ओळख करून घेणे व टनिग व बोअरिग करण्यास शिकणे.

साहित्य= लाकुड वेगवेगळे रॉड

साधने = लेथ मशीन

अनुमान = लेथ मशीनचा उपयोग अनेक टूल्स बनवण्यासाठी केला जातो.

4) रंगकाम करणे

उद्देश = रंगकाम करण्यास शिकणे

साहित्य = रंग , थिनर

साधने = स्प्रेगन कॉम्प्रेसर , लोखड टेबल , ब्रश

उपयोग = 1) वातावरणा पासून सुरक्षा करण्यासाठी

२) आकर्षक करण्यासाठी

३) वस्तुंचे आयुष्य वाढवण्यासाठी

5) पाईपला थेडीग व टॅपिंग करणे

उद्देश = पाईपला थ्रेडिंग व टॅपिंग करण्यास शिकणे

साधने = 1) डायस्टॉक 2) बुदली 3) टॅपिंग टुल 4) ठेपर टॅप 5) सेकंद टॅप 6) बोटमिंग टॅप

साधने = 1) पाईप 2) लोखंडी रॉड 3) ऑईल

थ्रेडिंग = थ्रेडिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे

टॅपिंग = टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे

निरीक्षण = टॅपिंग टूल थ्रेडिंग करताना ऑइलचा वापर करावा

अनुमान = वेगवेगळ्या पाईपसाठी वेगवेगळे टॅपिंग टूल वापरतात

6) घरच्या पायाची आखणी करणे .

साहित्य / साधने : वाळू , स्पिरीट लेवल ,लेवल ट्यूब , गुण्या , ओळंबा , मेजर टेप , ८ रॉड , लाइन दोरी

कृती : १) सर्वप्रथम सेंटर लाइन गुण्या व लाइन दोरी च्या मदतीने आखून घेतली .

२) ३ इंच सेंटर लाइन पासून आत व बाहेर बांधकाम लाइन काढून घेतली .

३) बांधकाम लाइन पासून ४ इंच वर फाऊंडेशन लाइन काढली .

४) फाऊंडेशन लाइन पासून ४ इंच वर पायाची लाइन काढली .

५) 90० मध्ये घरच्या पायाची आखणी केली .

कारपेट एरिया : बिल्डिंगच्या आतील वॉल टू वॉल एरिया

बिल्ट अप एरिया : बिल्डिंगचा पूर्ण एरिया

7)विटांची रचना व प्रकार

बॉन्ड व त्यांची माहिती :

१ ) स्ट्रेचर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंड स्ट्रेचर आडव्या ठेवल्या जातात . अनेक ठिकाणी हा बॉन्ड वापरला .

२ ) हेडर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर हेडर राखल्या जातात . यासाठी वक्र भाग तयार करतात .

३) फ्लेमिश बॉन्ड : क्वीन क्लोसेर ने होते . स्ट्रेचर आणि हेडर स्वारस्य मध्ये जोडणी असते .

४ ) इंग्लिश बॉब : स्ट्रेचर या हेडर बांधकम केल जात .

५) रॅट ट्रॅप बॉन्ड : मध्ये पोकळी असते. साहित्य कमी लागत आहे.

विटेला अर्धा , पाव , पावण कापणे याला सांधे मोड करणे .

फ्लेमिश बॉन्ड हा मजबूत बॉन्ड असतो .

8)वेल्डिंग

उद्देश : वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग करण्यास शिकणे व त्याचा महत्त्व समजून घेणे.

साधने : 1) वेल्डिंग मशीन 2)चिपिंग हॅमर 3) वेल्डिंग हल्मेट 4) वेल्डिंग गॉगल्स 5) सेफ्टी ग्लोज 6) सेफ्टी शूज 7) ऍप्रॉन

साहित्य : 1) इलेक्ट्रोड (वेल्डिंग रॉड) [2.5mm]

2) L अँगल

कृती : 1) सर्वप्रथम सर्व साहित्य साधने गोळा करणे.

2) टेबल बनवण्यासाठी आवश्यक त्या बापाचे L अँगल पावर कटरने कापून घेतले.

3) आर्क वेल्डिंग च्या साहाय्याने L अँगल व्यवस्थित जोडून घेतले.

4) वेल्डिंग करून झाल्यावर योग्य त्या प्रमाणे फिनिशिंग करून घेतले.

5) नंतर त्यांना कलर करून टेबल पूर्ण केला.

वेल्डिंग जॉइन्ट : 1) बट जॉइन्ट 2) कॉर्नर जॉइन्ट 3) टी जॉइन्ट

4) लॅप जॉइन्ट

वेल्डिंग रॉड : 1) लांबी – 250 mm ते 450mm पर्यन्त

2) व्यास – 205 mm

9)आर . सी . सी . कॉलम तयार करणे

उद्देश :- आर . सी . सी . कॉलमचे उपयोग व माहिती मिळवणे .

साहित्य :- 1) सिमेंट 2) वाळू 3) खडी 4) ऑईल

5) टॉर्शन बार 6) बायडिंग तार

साधने :- 1) थापी 2) फावडे 3) पॉवर कटर

4) साचा 5) मेजर टेप

कृती :- 1) सर्वप्रथम टॉर्शन बार कापून घेतले .(2.10 मी. उंचीचे 3 नग ) तसेच 31 सेमीचे राऊंड 7 बार कापून घेतले.

2) साचा पूर्णता स्वच्छ करून त्याला ऑइल लावला .

3) सिमेंट , वाळू , व खडी यांचे 1: 2: 4 हे प्रमाण घेतले . 35 ltr खडी , 17.5 ltr वाळू व 8.7 ltr सिमेंट घेतले .

4) साच्यामध्ये टॉर्शन बारला 7 राऊंड लावून ते साच्यात ठेवले व कॉक्रीट भरून कॉलम तयार केला .

PCC :- plain cement concrit

RCC :- rainforsed cement

10)फेरो सीमेंट शिट तयार करणे

उद्देश :- फेरो सीमेंट तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- 1) सीमेंट 2) वाळू 3) टॉर्शन बार

4) वेल्ड मेश जाळी 5) चिकन मेश जाळी

साधने :- 1) थापी 2) घमेले

3) पक्कड 4) फावडा

कृती :- 1) टॉर्शन बारची फ्रेम तयार केली . ( 90 cm x 42 cm )

2) फ्रेमला वेल्ड मेश जाळी तारेने बांधली तसेच त्यावर चिकन मेश जाळी तारेने बांधली .

3) मॉर्टरचे प्रमाण ( सीमेंट : वाळू = 1 : 3 ) तयार केले .

4) पहिले मॉर्टरचा थर टाकला त्यावर फ्रेम बसवली त्यावर पुन्हा मॉर्टरचा थर देऊन आयताकृती फेरोसिमेंटची शिट तयार केली .

5) 20 ते 21 दिवस त्याला क्युरिंग केले .

11)सोल्डरिंग करणे

उद्देश :- Gi पत्र्याच्या डब्याला सोल्डरिंग करणे.

साहित्य :- 1) सोल्डरिंग मटेरियल 2) HCI 3) जस्त

4) फ्लक्स

साधने :- 1) खड्या 2) ब्लॉ लॅम्प

कृती :- 1) HCI मध्ये जस्त टाकून फ्लक्स तयार केला.

2) खड्या ब्लॉ लॅम्पवर गरम करून घेतलं.

3) त्याने सोल्डरिंग मटेरियल सोल्डरिंग करण्याच्या ठिकाणी वितळवले व सोल्डरिंग केले.

कथिल (60%) + शिस (40%) = सोल्डरिंग मटेरियल

HCI + जस्त = फ्लक्स

खड्या हा नेहमी तांब्याचा असतो. कारण तांबे हा पदार्थ लवकर गरम होतो आणि लवकर थंड होतो.

12) बांधकामासाठी मातीची व सिमेंटची वीट तयार करणे.

उद्देश :- विटांचे प्रकार समजून घेणे.व विटा तयार करणे.

साधने :- वीट मेकर, थापी, घमेले इ.

साहित्य :- सिमेंट, वाळू, माती, पाणी इ.

कृती :- 1) सिमेंट व वाळू यांचे 1:6 या प्रमाणात मिश्रण तयार केले.

2) मिश्रण Bricks Maker मध्ये टाकून विटा तयार केल्या जातात.

3) एका विटेची लांबी 35 cm रुंदी 15 cm व उंची 15 cm घेतली आहे.

4) या विटेसाठी 1.1 ltr. सिमेंट व 6.6 ltr. वाळू लागली.