Ferrocement (फेरो सिमेंट)-
- Ferrocement ही सिमेंट मोर्टार आणि बारीक लोखंडी जाळी (Wire Mesh) वापरून तयार केली जाणारी बांधकाम पद्धत आहे.
- यामध्ये लोखंडी जाळीला योग्य आकार देऊन त्यावर सिमेंट, बारीक वाळू आणि पाण्याचे मिश्रण लावले जाते.
- सिमेंट मोर्टार घट्ट झाल्यानंतर मजबूत आणि टिकाऊ संरचना तयार होते.
प्रमुख साहित्य:
- सिमेंट
- बारीक वाळू
- पाणी
- लोखंडी जाळी
- (Wire Mesh)लोखंडी तार
तयार करण्याची प्रक्रिया:
- प्रथम लोखंडी जाळी आवश्यक आकारात तयार केली जाते.
- जाळीला योग्य आकार देऊन घट्ट बांधले जाते.सिमेंट आणि बारीक वाळूचे मोर्टार तयार केले जाते.
- हे मोर्टार लोखंडी जाळीवर व्यवस्थित लावले जाते.संपूर्ण जाळी मोर्टारने झाकल्यानंतर Curing केले जाते.
- मोर्टार पूर्णपणे मजबूत झाल्यानंतर तयार Ferrocement संरचना वापरली जाते.
उपयोग:
- पाण्याच्या टाक्या,छत व भिंती छोटे पूल,नाले
- शेतीतील विविध संरचनाविविध आकाराच्या बांधकाम वस्तू
फायदे:
- मजबूत आणि टिकाऊ असते.
- तुलनेने कमी जाडीची संरचना तयार करता येते.
- विविध आकारांमध्ये तयार करता येते.
- योग्य पद्धतीने तयार केल्यास पाण्याच्या साठवणुकीसाठी उपयुक्त असते.
- दुरुस्ती व देखभाल तुलनेने सोपी असते.
काळजी:
- लोखंडी जाळी योग्य प्रकारे बसवावी.
- मोर्टार जाळीवर पूर्णपणे आणि समान प्रमाणात लावावे.
- तयार संरचनेचे योग्य Curing करावे.
- काम करताना हातमोजे व इतर आवश्यक सुरक्षा साधने वापरावीत

