सूप प्रीमिक्स – संपूर्ण माहिती

प्रस्तावना

आजच्या धावपळीच्या जीवनात इन्स्टंट सूप प्रीमिक्स हा एक अतिशय सोयीस्कर आणि पौष्टिक पर्याय आहे. फक्त गरम पाण्यात मिसळून 2-3 मिनिटांत स्वादिष्ट सूप तयार होते. या प्रीमिक्समध्ये डाळी, मसाले आणि नैसर्गिक घटकांचा समावेश असल्यामुळे चव आणि पोषण दोन्ही मिळते.

आवश्यक साहित्य (2.5 किलो बॅच)

क्र. प्रमाण

1 मुग डाळ 500 ग्रॅम

2 मसूर डाळ 500 ग्रॅम

3 तूर डाळ 250 ग्रॅम

4 कुलीथ 250 ग्रॅम

5 अख्खा धना 100 ग्रॅम

6 जिरे 75 ग्रॅम

7 सैंधव/काळे मीठ 50 ग्रॅम

8 हिंग 50 ग्रॅम

9 लवंग 15 ग्रॅम

10 मीठ 100 ग्रॅम

11 लाल तिखट 50 ग्रॅम

कृती

1. सर्व डाळी स्वच्छ करून निवडून घ्याव्यात.

2. डाळी मंद आचेवर हलक्या भाजून पूर्ण थंड कराव्यात.

3. धणे, जिरे आणि लवंग वेगवेगळे भाजावेत.

4. सर्व साहित्य थंड झाल्यावर ग्राइंडरमध्ये बारीक पावडर करावी.

5. त्यामध्ये मीठ, सैंधव, हिंग आणि लाल तिखट मिसळावे.

6. मिश्रण चाळणीने चाळून एकसारखे करावे.

7. तयार प्रीमिक्स ओलावा नसलेल्या हवाबंद डब्यात किंवा पाउचमध्ये भरावा.

सूप बनवण्याची पद्धत

•25-30 ग्रॅम प्रीमिक्स घ्या.

•200-250 मि.ली. पाण्यात मिसळा.

•सतत ढवळत 3-5 मिनिटे उकळा.

•इच्छेनुसार बटर किंवा कोथिंबीर घाला.

•गरमागरम सूप सर्व्ह करा.

कॉस्टिंग साहित्य किंमत (₹)

मुग डाळ 60.00

मसूर डाळ 50.00

तूर डाळ 35.00

कुळीद 20.00

lधना 30.00

जिरे 45.00

सैधा नमक 35.00

हिंग 50.00

लवंग 4.50

मीठ 3.00

लाल तिखट 16.00

ग्राइंडिंग चार्ज 10.00

कच्चा माल एकूणः ₹358.50

इतर खर्च किंमत

पाउच (16 × ₹3) ₹48.00

स्टिकर (16 × ₹2) ₹32.00

उपएकूणः ₹438.50

मजुरी (35%): ₹156.97

एकूण उत्पादन खर्चः₹595.47 (अंदाजे ₹600)

पॅकिंग150 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम

•फूड-ग्रेड पाउच वापरावेत.पॅकवर उत्पादनाचे नाव, घटक, वजन, बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि बनवण्याची पद्धत छापावी.

150 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम फूड-ग्रेड पाउच वापरावेत.

.साठवण

कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवावे.

ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.

हवाबंद पॅकमध्ये 6 महिने सहज टिकते.

फायदे

2-3 मिनिटांत तयार.

प्रथिनयुक्त आणि पौष्टिक.

प्रवासासाठी आणि ऑफिससाठी उत्तम.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: true; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;