निर्धूर चूल
प्रस्तावना:
निर्धूर चूल ही धूर कमी करणारी सुधारित चूल आहे. स्वयंपाक करताना निर्माण होणारा धूर चिमणीद्वारे बाहेर सोडला जातो.
उद्देश:
- घरातील धूर कमी करणे
- इंधनाची बचत करणे
- स्वयंपाकघरातील हवा स्वच्छ ठेवणे
- आरोग्याचे संरक्षण करणे
साहित्य:
विटा, सिमेंट, माती, लोखंडी जाळी/प्लेट, चिमणी, पाइप इत्यादी.
कुठे वापरतात:
ग्रामीण भागातील घरांमध्ये, शेतातील घरे आणि जिथे लाकूड किंवा इतर घन इंधन वापरले जाते तिथे.
कार्यपद्धती:
इंधन जाळल्यावर तयार झालेला धूर चुलीच्या धूरवाहिनीतून चिमणीकडे जातो आणि चिमणीद्वारे बाहेर सोडला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरात धूर साचत नाही.