मल्टीमीटर व क्लाम्प मीटर वापरून रीडिंग घेणे

मल्टिमीटर वापरून रीडिंग घेणेतयारी:

काम सुरू करण्यापूर्वी सर्किटमधील वीज बंद करा. डिजिटल मल्टिमीटरचे काळे वायर (COM) पोर्टमध्ये आणि लाल वायर व्होल्टेज/रेजिस्तान्स (V/Ω) किंवा करंट (A) पोर्टमध्ये लावा.व्होल्टेज मोजणे :

नॉब ‘V’ वर सेट करा (AC किंवा DC तपासून). प्रोब टोके पॉवर पॉईंट किंवा टर्मिनलला लावा. स्क्रीनवर रीडिंग येईल.रेजिस्तान्स मोजणे :

पॉवर बंद ठेवा. नॉब ‘Ω’ (Ohms) वर सेट करा. दोन्ही प्रोब रेजिस्तान्सच्या दोन टोकांना लावा.करंट मोजणे :

सर्किट तोडून (In-series) मल्टिमीटर जोडावे लागते. नॉब ‘A’ वर सेट करून योग्य पोर्टमध्ये लाल वायर लावा.क्लॅम्प मीटर वापरून रीडिंग घेणेमोड निवडणे:

क्लॅम्प मीटरचा मुख्य डायल ‘A’ किंवा ‘Ω’ (Ohms) वर हवा तसा सेट करा.करंट मोजताना जबाचा वापर :

क्लॅम्प मीटरचा जबडा (Jaw) उघडा. कोणत्याही एकाच वायरभोवती (फक्त लाईव्ह किंवा न्यूट्रल) जबडा बंद करा. एकाच वेळी दोन-तीन वायर पकडल्यास शून्य (0) रीडिंग येईल.रीडिंग वाचणे:

वायरमधील चुंबकीय क्षेत्रावरून मीटर थेट करंटचे मूल्य स्क्रीनवर दाखवते. सर्किट तोडण्याची गरज पडत नाही.