पिलांचे ब्रूडिंग
उद्देश:
नवजात ब्रॉयलर पिल्लांना योग्य उष्णता, पाणी व खाद्य देऊन त्यांची चांगली वाढ करणे.
साहित्य: ब्रूडर, हीट लॅम्प, थर्मामीटर, खाद्यपात्र, पाण्याचे भांडे आणि लिटर.
कृती:

ब्रूडिंगची जागा स्वच्छ करून निर्जंतुक केली.
जमिनीवर कोरडे लिटर पसरले.
ब्रूडर सुरू करून आवश्यक तापमान तपासले.
पिल्लांना ब्रूडरमध्ये सोडले.
स्वच्छ पाणी व स्टार्टर खाद्य दिले.
पिल्लांचे वर्तन पाहून तापमान योग्य आहे का ते तपासले.
दररोज पाणी, खाद्य, तापमान व स्वच्छता तपासली.