पॉलीहाऊस म्हणजे काय?
पॉलीहाऊस म्हणजे पॉलीथिन आच्छादनाखाली नियंत्रित वातावरणात शेती करण्याची आधुनिक पद्धत. तापमान, आर्द्रता, प्रकाश आणि पाण्याचे व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेता येते.
2) पॉलीहाऊसचे प्रकारनैसर्गिक वायुवीजन पॉलीहाऊसफॅन – पॅड (क्लायमेट कंट्रोल पॉलीहाऊस)लो टनेलशेडनेट हाऊसइन्सेक्ट नेट हाऊसप्रत्येक प्रकारची उपयोगिता, खर्च व व्यवस्थापन वेगवेगळे असते.
3) फायदेवर्षभर उत्पादन.हवामानानुसार संरक्षण.पाण्याची बचत.अधिक उत्पन्न व दर्जेदार माल.नियमित गुणवत्ता.कीड-रोगांचे प्रमाण कमी.
4) तोटेप्रारंभिक गुंतवणूक जास्त.तांत्रिक ज्ञान आवश्यक.नियमित देखभाल करावी लागते.वादळ किंवा गारपीटीमुळे नुकसान होऊ शकते.
5. बांधनि
बांधणीयोग्य ठिकाणाची निवड. उत्तर–दक्षिण दिशा, GI पाईप फ्रेम, UV स्टॅबिलाईज्ड फिल्म, कीटकजाळी, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, बेड तयार करणे, वायुवीजन व्यवस्था.
6) पॉलीहाऊसमधील प्रमुख पिकेढोबळी मिरचीटोमॅटोकाकडीवांगीस्ट्रॉबेरीगुलाबजर्बेराकार्नेशनलिलीऑर्किड
7) खत व्यवस्थापनमाती व पाण्याची तपासणी करावी. विद्राव्य खतांचा फर्टिगेशनद्वारे वापर करावा. NPK, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये नियोजनानुसार द्यावीत. EC व pH नियमित तपासावे.
8) व्यवस्थापनाची कामेतापमान व आर्द्रतेची नोंद ठेवणे.ठिबक प्रणाली तपासणे.कीड-रोग निरीक्षण.सुकलेली पाने काढणे.आवश्यकतेनुसार खत व पाणी देणे.वायुवीजन व स्वच्छता राखणे.
9) पॉलीहाऊसचे विज्ञानहरितगृह परिणामामुळे उष्णता नियंत्रित राहून प्रकाशसंश्लेषणासाठी योग्य प्रकाश मिळतो. तापमान, आर्द्रता, सिंचन आणि पोषण व्यवस्थापनामुळे आतील CO₂ व वनस्पतींची वाढ उत्तम होते. ठिबक व फर्टिगेशनमुळे पाणी व खत यांचा कार्यक्षम वापर होतो. त्यामुळे कार्यक्षमता वाढते.

