Agriculture project Vertical Garden
Ketan kamdi
साथीदार – गणेश ,
उद्देश – गार्डन तयार करणे .
कृती – सर्वप्रथम आम्ही ज्या जागेवर गार्डन करायचे आहे तिथे साफसफाई करून तिथे शेणखत पसरवले, त्यावर माती पसरवली आणि ते चांगले एकत्र. करून घेतले व त्यावर पाणी मारून थोडे ओले केले .
तिथे विटांचे कंपौंड केले , त्यावर आम्ही तुती ची झाडे लावली की जेणेकरून शेल्यांसाठी त्याचा खाद्यासाठी उपयोग होईल .
तिथे अजून कोरफड , मोगरा , निवडुंग , सदाफुली , ब्रम्हकमळ , पपई अशी रोपे लावली .
त्यानंतर भिंतीवर लावण्यासाठी आम्ही वाया गेलेल्या पाण्याच्या बॉटल्स गोळा केल्या .
त्या बॉटल्स चे स्टिकर काढून त्या एक विशिष्ट आकारात कापल्या की त्यात एक रोप लावता यावं .
कट करून झाल्यावर त्या एकमेकांत गुंतण्यासाठी बॉटल्स चा खालच्या बाजूला ड्रिल मशीननेहोल केले.
आम्ही एक सेट 4 बॉटल्स च असे 5 सेट तयार केले .आणि ते भिंतीवर लावले त्यात माती टाकून चीनिगुलाब हे एक फुलझाड लावले. असे आम्ही हे vertical garden तयार केले.