जैविक खते तयार करणे ( गांडूळ खत )
कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि मातीच्या सुपीकतेला कायम ठेवण्यासाठी
खतांचा वापर एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु, रासायनिक खतांमुळे पर्यावरणीय प्रदूषण
आणि मातीची गुणवत्ता कमी होऊ शकते. यामुळे, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उपाय म्हणून
जीविक खते (Organic Fertilizers) तयार करण्याकडे शेतकरी आणि कृषी तज्ञांचे लक्ष वळले आहे
•जीविक खते हे जैविक स्रोतांपासून बनवले जातात, ज्यामध्ये पीक लागवडीला आवश्यक असलेले पोषणतत्त्वे असतात.
यामध्ये कोणत्याही रासायनिक मिश्रणाचा वापर न करता, नैतिक आणि सेंद्रिय सामग्रीपासून तयार केले जाते.
यामध्ये प्रमुख घटक असतात – नायट्रोजन (N), फॉस्फोरस (P), पोटॅशियम (K), कॅल्शियम (Ca),
मॅग्नेशियम (Mg), सल्फर (S) आणि इतर सूक्ष्म पोषणतत्त्वे.
गांडूळ खत पैदास तंत्र:
गांडूळ पैदास करण्यासाठी इसिनिया फोयटीडा या विदेशी जातींचा वापर करावा. तसेच गांडूळाचे खड्ड्यावर दिवसभर सावली राहिली , याप्रमाणे छप्पर करावे साधारणपणे 2000 गांडूळ खतामध्ये सोडून त्यापासून प्रजनन, तसेच गांडूळ खत मिळवण्यासाठी जमिनीमध्ये 20 सेंटीमीटर ची एक मीटर लांबी व 60 सेमी रुंदी असा खड्डा खोदावा. या खड्ड्यामध्ये आधारित कंपोस्ट खत व अर्धे कंपोस्ट खत व अर्धे अर्ध कुजलेले सह्याद्री पदार्थ म्हणजेच पालपाचोळा मिसळून खड्ड्यात भरवा म्हणजेच हे गादी वाफ तयार होईल. हे खत अंदाजे 200 किलो होते. या गादी वाफेमध्ये 2000 गांडूळ सोडावेत, गांडूळ सोडल्यानंतर या गादी वाफेवर गोण पाटाचे अच्छादन करून त्यावर दिवसातून पाच वेळा पाणी शिंपडावे. अशाप्रकारे गांडूळ खत तयार होते. हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे. शक्य खत वेगवेगळे करताना अवजाराचा (टिकाऊ, खोरे, खुरपे इत्यादी ) वापर करू नये. त्यामुळे गाढवांनी इजा पोचते. पूर्ण वाढ झालेले गांडूळ वर नेमूत केल्याप्रमाणे पुन्हा गादी वाफेत सोडावेत. या गांडूळ खतामध्ये गांडूळ यांचे अंडी त्यांचे विस्टा , मिश्रण टाकून त्यात मिसळून घ्यावे. तेथे गांडुळांची पद्धत सुरू होते परंतु हा खड्डा नेमूत असल्यास ठेवा. म्हणून तो खत करण्याच्या उपयुक्त असते.
गाढवांचे शेतासाठी फायदे
1) पाणी धारण करण्याची क्षमता वाढवणे
2)मुलायम व खनिज जिवाणूंचे संरक्षण
3)पर्यावरणास अनुकूल
4)गांठ व गंधाची समस्या नाही
5(किमतीमध्ये कमी खर्च
6)शरीरिक आरोग्याची व संरक्षणाची काळजी
7)रोग नियंत्रण
शेळी पालन
• शेळीच्या जाती
(अ) देशी जाती
- उस्मानाबादी
- संगमनेरी
- जमनापारी
- सिरोही
(ब) विदेशी जाती
- सानेन
- आफ्रिकन बोअर
- अल्पाइन
- अंगोरा
- तोगेनबर्ग
• मेंढ्यांच्या जाती
(अ) देशी जाती
- दख्खनी
- नेल्लोर
- बन्नूर
- माडग्याळ
(ब) विदेशी जाती
- मेरीनो
• शेळ्यांचे प्रजनन
- वयात येण्याचा काळ सरासरी 7 ते10 महिने.
- प्रथम गर्भ राहण्याचे वय 11 ते 15 महिने.
- प्रथम गाभण राहताना शरीराचे वजन 22 ते 24 kg.
- गाभण काळ 145 ते 150 दिवस.
- दोन वेतातील अंतर 7 ते 9 महिने.
• मेंढ्यांचे प्रजनन
- मेंढींचा गाभण काळ 142 दिवस ते 152 दिवस.
- प्रथम गाभण राहण्याचे वय 14 ते 20 महिने.
- मेंढ्यांच्या ऋतुकालाचा अवधी 36 तास.
• खाद्य ( Feeding )
- Dicoats plants ( द्विद्वल झाडे)
- monocoats plants ( एकदल झाडे )
- Dry fodder ( सुखा चारा )
- concentrated feed ( खुराक/ रतीब )
माती परीक्षण
• माती परीक्षण म्हणजे :-
- शेतजमीनीतील रासायनिक आणि जैविक घटकांचे विश्लेषण करणे.
- माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कळते, त्यानुसार कोणत्या पिकांसाठी ती उपयुक्त आहे आणि कोणत्या घटकांची कमतरता आहे हे समजते.
- एकंदरीत माती परीक्षणातून जमिनीची सुपीकता, आरोग्य आणि उत्पादकता समजते.
• माती परीक्षण का?
- मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते.
- जमीन आम्लधर्मी आहे की विम्लधर्मी हे समजते.
- संतुलित खतांचा वापर आणि खतांचे बचत करता येते.
- अन्नद्रव्यांचा समतोल राखणे.
- जमिनीची सुपीकता टिकवणे.
• मातीचा नमुना केव्हा घ्यावा :-
- मातीचा नमुना पीक काढणीनंतर आणि नांगरणीच्या आधी घ्यावा.
- खाते टाकल्यानंतर मातीचा नमुना घेऊ नये.
- पिकांमधील दोन ओळींच्या मधून माती घ्यावी.
• मातीचे नमुने कसे घ्यावेत :-
- सर्वात आधी नमुना घेण्याचा जागा निश्चित करावे.
- सदरच्या ठिकाणी इंग्लिश ‘ V ‘ आकाराच्या 20cm खोलीचा खड्डा घ्यावा त्या खड्ड्यातील माती बाहेर काढावी.
- सर्व खड्ड्यांमधून माती एकत्र करून त्यांचे समान चार भाग करावे.
- समोरील दोन बाजूंची माती काढून टाकावी आणि पुन्हा मातीचे चार भाग करावे. ( अशी कृती 0.5 kg माती होईपर्यंत करत राहावी. )
- वरील माती ओली असेल तर ती सावलीत वाळवावी.
• नमुना तपासणीसाठी देताना घ्यायची काळजी :-
- नमुना क्रमांक
- नमुना घेतल्याची दिनांक
- शेतकऱ्याचे संपूर्ण नाव
- गाव, पोस्ट, जिल्हा, तालुका
- सर्वे किंवा गट क्रमांक
- नामुन्यांचे क्षेत्र
- बागायत किंवा जिरायत
- मागील हंगामातील पीक आणि वाण
- पुढील हंगामातील पीक आणि वाण
- जमिनीचा उतारा किंवा सपाट
- पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट.
• माती परीक्षणाचे फायदे :-
- माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्य आणि जमिनीचे दोष समजतात आणि त्याप्रमाणे नियोजन करता येते.
- जमीन आम्लधारी किंवा विम्लधारी हे समजते त्यानुसार पिकांची निवड आणि खतांची नियोजन करता येते.
- जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात.
- खतांचा संतुलित वापर होऊन खतांचा येणारा खर्च कमी करता येतो.
- जमिनीची सुपीकता टिकून ठेवता येते आणि उत्पादन क्षमता वाढवता येते.
• उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण :-
कुक्कुटपालन
• कोंबड्यांच्या जाती संकरित व गावठी
कोंबड्यांची अंडी मास व पिल्लांच्या उत्पादनासाठी पाळल्या जातात. या व्यवसायातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीच्या कोंबड्यांची निवड करून व्यवसाय करावा..
1. गिरीराज
ही जात अंडी मास उत्पादनासाठी उपलब्ध असते. एका दिवसाचे पिल्लाचे वजन 45gm असते. या जातीच्या नराचे वजन 4 ते साडेचार पर्यंत असते. या जातीच्या मादी वर्षाला किमान 230 ते 250 अंडी देते. अंड्यांचा रंग तपकिरी असते. या जातीचा वापर जास्त प्रमाणात होतो.
2. वनराज
वनराज ही हैदराबादच्या कुक्कुटपालनाच्या प्रकल्प संचनाद्वारे विकसित केलेली आहे. या कोंबड्यांचे एक दिवसाचे पिल्लू 40 ते 50gm एवढे असते. या जातीची मादी वर्षाला 180 ते 200 अंडी देते.
3. कावेरी
या कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरान चवदार सारखे असते. या कोंबड्या वर्षभरात 180 ते 200 अंडी देतात. अंडी व मास यासाठी फायदेशीर ठरते.
4. सह्याद्री/ सातपुडा
ही जात कोकणातल्या वातावरणासाठी असून यामध्ये विविध रंगाचे प्रकार आढळतात. काटक व रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. या कोंबड्यांचे मास खाण्यासाठी गावरान सारखी चवदार असते. सरासरी वजन 3 ते 3.5 एवढे असते. या कोंबड्या वर्षभराला 180 ते 200 अंडी देतात. अंड्यासाठी व मासासाठी फायदेशीर ठरते.
• अंडी व मांस उत्पादनासाठी ही कोंबडी पाळली जाते:-
- कलिंगा ब्राऊन:- कलिंगा ब्राऊन ही कोंबडी उत्पादनक्षम अशी सुधारित गावरान कोंबड्यांची जात आहे. या कोंबड्यांच्या मासाची चव देशी कोंबड्यांसारखे असते.
- कडकनाथ:- कडकनाथ हे देशी कोंबड्यांची दुर्मिळ प्रजात आहे. औषधी गुणधर्म व चविष्ट माप यासाठी या कोंबड्या प्रसिद्ध आहेत. या जातीच्या मासाला बाजारात मोठी मागणी असते.
• विदेशी जाती
- व्हाइट लेगहॉर्न :- इटली देशातील ही जात लेगहॉर्न या गावाचे असून ती हलक्या जातीमध्ये मोडते. या कोंबड्या वर्षाला दोनशे ते तीनशे इतके अंडी देते. या जातीच्या कोंबड्यांचे व्यवस्थापन व्यावसायिक दृष्ट्या काळाजीपूर्वक करावी लागते.
- न्होड आयलँड रेड :- ही मुळीच अमेरिकेतला न्होड आयलँड अमेरिका बेटातील आहे. या जातीची कोंबडी वर्षाला सुमारे 180 ते 200 अंडी देते. सरासरी वजन 56kg असते.
आहारः– कोंबड्यांना संतुलित आहार द्या, ज्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, आणि जीवनसत्त्वे असावीत.त्यांना पाण्याची चांगली उपलब्धता हवी.
४. आरोग्यःनियमित आरोग्य तपासणी करा.लसीकरण आणि रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करा.
५. बाजारपेठः- स्थानिक बाजारात अंडी आणि मांसाची विक्री करणे.ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आपल्या स्थानिक वातावरणानुसार योग्य तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे महत्त्वाचे आहे.