1) माती नमुना गोळा करणे : माती परीक्षणासाठी योग्य पद्धतीने नमुना गोळा करणे आवश्यक असते.शेतातील 8–10 ठिकाणांहून नमुना घ्यावा.15–20 से.मी. खोलीपर्यंत V आकाराचा खड्डा करून माती घ्यावी.दगड, गवत, मुळे व कचरा काढून टाकावा.सर्व नमुने एकत्र मिसळून सुमारे 500 ग्रॅम माती प्रयोगशाळेत पाठवावी.नमुन्यावर शेतकऱ्याचे नाव, गाव, सर्व्हे नंबर, पीक व तारीख लिहावी.
2) माती परीक्षण : (Soil Testing – pH, NPK): माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता व अन्नद्रव्यांची माहिती मिळते.
pH: माती आम्लधर्मी, तटस्थ किंवा क्षारधर्मी आहे हे समजते.
N (नायट्रोजन): पानांची व खोडाची वाढ होते.
P (फॉस्फरस): मुळांची वाढ, फुले व फळधारणा वाढते.
K (पोटॅशियम): रोगप्रतिकारशक्ती, उत्पादन व दर्जा सुधारतो.
3) पाणी परीक्षण (Water Testing – pH, EC, H₂S) : पिकांसाठी पाण्याची गुणवत्ता तपासली जाते.pH: पाण्याचा आम्ल-क्षारपणा.EC (Electrical Conductivity): पाण्यातील क्षारांचे प्रमाण.H₂S Test: पाण्यातील दूषितपणा किंवा जीवाणूंची उपस्थिती तपासली जाते.
4) टिश्यू कल्चर : वनस्पतीच्या छोट्या भागापासून निर्जंतुक वातावरणात नवीन रोपे तयार करण्याची पद्धत.
मीडिया तयार करण्यासाठी साहित्य:MS MediaSucrose (साखर)AgarPlant Growth RegulatorsDistilled Waterप्रक्रिया:सर्व रसायने योग्य प्रमाणात मिसळावीत.
pH 5.7–5.8 ठेवावा.Agar मिसळून गरम करावे.बाटल्यांमध्ये भरून Autoclave मध्ये निर्जंतुकीकरण करावे.Laminar Air Flow मध्ये Explant लावावा.
5) प्रयोगशाळेतील उपकरणे :
- Laminar Air Flow
- Autoclave
- Hot Air Oven
- pH Meter
- EC Meter
- Electronic Balance
- Micro pipette Beaker Conical Flask
- Test Tube Measuring Cylinder