शेळी पालन – दूध, मांस आणि शेणासाठी शेळ्या पाळल्या जातात. कमी खर्चात चांगला व्यवसाय आहे.
शेळीची जात निवड – उद्देशानुसार योग्य जात निवडावी.
दुधासाठी – सानेन
मांसासाठी – बोअर
दोन्हीसाठी – उस्मानाबादी, बीटल
गोठा व्यवस्थापन – गोठा स्वच्छ, कोरडा, हवेशीर आणि पावसापासून सुरक्षित असावा.
खाद्य व्यवस्थापन – हिरवा चारा, सुका चारा, संतुलित खाद्य आणि स्वच्छ पाणी नियमित द्यावे.
ब्रीडिंग (प्रजनन) – निरोगी नर-मादी निवडून योग्य वयात प्रजनन करावे.
लसीकरण – पीपीआर, एफएमडी, गोट पॉक्स इत्यादी रोगांपासून बचावासाठी वेळेवर लसी द्याव्यात.
रोग व लसीकरण – आजारी शेळी वेगळी ठेवून त्वरित पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.
मार्केटिंग – शेळ्या किंवा त्यांची उत्पादने योग्य बाजारात विकून अधिक नफा मिळवावा.
शासकीय योजना – शासनाच्या अनुदान व कर्ज योजनांचा लाभ घ्यावा.
वजन घेणे – दर ६ महिन्यांनी शेळीचे वजन तपासावे. त्यामुळे योग्य आहार व आरोग्य व्यवस्थापन करता येते.