Extention board bharne –

माहिती :

  • एक्स्टेंशन बोर्ड हे एक विद्युत उपकरण आहे. याचा उपयोग एका प्लगच्या साहाय्याने अनेक विद्युत उपकरणांना वीजपुरवठा करण्यासाठी केला जातो.
  • यामध्ये प्लग, सॉकेट, वायर, स्विच आणि फ्यूज यांचा वापर केला जातो.
  • एक्स्टेंशन बोर्डची अंतर्गत वायरिंग योग्य पद्धतीने केल्यास विद्युत उपकरणांना सुरक्षितपणे वीजपुरवठा करता येतो.

वायरिंगमधील वायरचे प्रकार :

  • फेज वायर (Phase): विद्युत प्रवाह उपकरणापर्यंत नेते.
  • न्यूट्रल वायर (Neutral): विद्युत परिपथ पूर्ण करण्यासाठी वापरली जाते.
  • अर्थिंग वायर (Earthing): विद्युत गळती झाल्यास सुरक्षिततेसाठी वापरली जाते.

आवश्यक अवजारे :

  • स्क्रूड्रायव्हर
  • वायर कटर
  • वायर स्ट्रिपर
  • टेस्टर

प्रक्रिया (Process) :

  • सर्वप्रथम एक्स्टेंशन बोर्ड, प्लग, सॉकेट, वायर व आवश्यक अवजारे घेतले.एक्स्टेंशन बोर्डचे बाहेरील कव्हर काळजीपूर्वक उघडले.
  • बोर्डमधील प्लग, सॉकेट, स्विच व वायर यांची ओळख करून घेतली.वायरचे योग्य माप घेऊन आवश्यक तेवढी वायर तयार केली.
  • वायरचे टोक स्ट्रिपरच्या साहाय्याने सोलले.फेज, न्यूट्रल व अर्थिंग वायरची ओळख करून घेतली.प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वायरिंग जोडणी केली.
  • सर्व टर्मिनलचे स्क्रू घट्ट केले.वायर सैल राहणार नाहीत याची तपासणी केली.
  • बोर्डचे कव्हर व्यवस्थित बसवले.प्रशिक्षकांनी तपासणी केल्यानंतर बोर्डचे कार्य पाहिले.

काळजी :

  • वायरिंग करताना वीजपुरवठा बंद असावा.
  • वायरची जोडणी घट्ट असावी.
  • फेज, न्यूट्रल व अर्थिंग योग्य ओळखावे.
  • खराब वायर वापरू नयेत.
  • वायरिंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावी.

निष्कर्ष: या प्रॅक्टिकलमध्ये एक्स्टेंशन बोर्डची अंतर्गत वायरिंग करणे, वायरचे प्रकार व विद्युत जोडणी यांची माहिती मिळाली.