.

मुरघास तयार करणे .

. साहित्य – मका विळा, कुट्टी माशीन, कल्चर8 ,केबल टाय, सेलोटेप, बॅग.

. कृती – 1. मका तोडली

. 2. तोडलेली मका कुट्टी मशीन जवळ आणली .

. 3. मक्याचे 1ते 2 cm अंतराचे कुट्टी मशीन ने तुकडे केले .

. 4. Rumiferm powder + 2 टप कुट्टी यांचे मिश्रण.

. 5. एका बॅग मध्ये 2 टप कूटी टाकल्यावर त्या मध्ये 1 मुठ कल्चर .

. 6. पायाने दाबून ब्बाग भरल्यावर तोंडला केबल टाय ने पॅक बंद करावे .

. 7. नंतर सेलोटेप ने पॅक करून घेणे .

. अटमकेचे कणीस दुधाळ अवस्थेत असतानाच मका तोडावी.

. प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे

साहित्य – मीटर टेप , वजन काटा.

. कृती -. करण्याच्या 2 पद्धती.

. 1. वजन काटा .

. 2 . सूत्र वापरून .

. आम्ही शेळी चे वजन डिजिटल काट्यावर केलं

.

गाई चे वजन सूत्र वापरून काढले .

. सूत्र -. वजन = छातीचा घेरा × लांबी / 666

.

. गणित -. वजन = छातीचा घेरा2 × लांबी / 666

.

. 1156 × 44 / 666 = 76.37 kg

शेतीच्या मोजमापकांचा अभ्यास करणे

साहित्य – मीटर टेप .

. 1. 100m = 328feet 1inch

. 2. 700feet = 213.36 m

. 3. 1 गुंठा. = 33×33 1089sqfeet

. 4. 40 गुंठा =. 1 एकर

. 5. 2.5एकर. =. 1 हेक्टर

. 6. 1 हेक्टर. =. 108900sqfeet

.

. रोप लागवडी ची संख्या ठरवणे.

. साहित्य – मीटर टेप.

. रोपांमधील अंतर समान असल्यावर –

. 1. वाढ चांगली होते .

. 2. सर्व रोपांना सूर्यप्रकाश मिळतो.

. 3. हवा खेळती राहते .

. रोपांची संख्या = क्षेत्रफळ/ रोपांचे अंतर

. उदा . केळी – 1.5m× 1.5m या अंतरावर एका एकर मध्ये किती रोप लागतील.

. 1 एकर = 43560sqfeet

. 1 एकर =. 13200m

. रोपांची संख्या = क्षेतरफळ / रोपांमधील अंतर

. = 43560/1.5× 1.5

. = 13200 /2.25

. = 5860 रोपे

पीक लागवडी जमीन तयार करणे

१. जमीन निश्चित करणे.

२. जमीन स्वच्छ करणे.

३. शेताची फनफाळी करून जमीन समतोल करणे.

. ४. पिकाच्या प्रकारानुसार सरी ,साऱ्या,वाफे तयार करून घेणे .

. ५. पाणी देण्याची सोय करणे.

. झाडे लावण्याच्या पद्धती

 1. आयत पद्धती – यामधे आपण ४ कोणावरती झाडे लावतो परंतु सेंटर ची जागा वाया जाते म्हणून आपण मध्यभागी एक एक झाड लावू शकतो.
 2. चौकोन पद्धती – इथे ही आपण ४ कोनांवर समान अंतरावर झाडे लावतो इथे ही मध्यभागी एक झाड लावू शकतो.
 3. त्रिकोण पद्धती – यामधे आपण 3 कोणावरती झाडे लावतो.
 4. षटकोन पद्धती – इथे आपण 6 कोणावरती समान झाडे लावतो व मध्यभागी एक पीक घेऊ शकतो.
 5. कंटुर पद्धती – या पद्धती मध्ये आपण उताराच्या जागेवर समान अंतर घेऊन झाडे लावतो.

. पिकांना लागणारी अन्नद्र्व्य

प्रमुख अन्नद्रव्य -. 1. नत्र

2 स्फुरद

3 पालाश

अन्नद्रव्य -.

लोह , बोरॉन , जस्त, मंगल, मॉलिब्डेनम,तांबे गंधक.

वनस्पती संरक्षण उपकरणांचा वापर आणि उपयोग

फवारणी करताना घेतली जाणारी काळजी – 1. औषध फवारणी आधी पंप स्वच्छ धुऊन घ्यावे .

2. पाणी व औषधाचे प्रमाण निश्चित करून घ्यावे .

3. फवारणी करताना पंपाचे नोजल पूर्ण काम करत आहे का ते पाहावे .

4. फवारणी करण्या आधी हॅण्डग्लोज आणि मास्क लावावा.

5. फवारणी करताना औषध अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी.

.6. फवारणी करून झाल्यावर पुन्हा पंप स्वछ धूऊन जागेवर ठेवणे.

पंपाचे प्रकार. 1 power duster. 2 Hand sprayer. 3. Knapsack sprayer 4. Knapsack power sprayer 5. Hand operated power sprayer.

पिकाला पाणी देण्याची पद्धती

 1. पृष्भागावर पाणी देणे. – 1 मोकळे पाणी सोडणे 2. सपाट वाफ्यात पाणी सोडणे. 3. सार पद्धतीने पाणी सोडणे.
 2. त्यामधे आम्ही plot no 4 या ठिकाणी पाणी दिले
 3. तिथे 12min येवढं वेळ लागला .
 4. 3600लिटर पाणी दिले .

2 तुषार सिंचन

. कमतरता -. Dry spot , हवा, ऊन,२५% पाणी वाया जाते.

लेयर पोल्ट्री अर्थकारण

. पोल्ट्री बांधण्यासाठी खर्च – 32×12

सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे

. साहित्य – सुका चारा ,कुट्टी मशीन, गूळ , मीठ , पाणी, बादली , ताडपत्री.

कृती – 1. सुक्या चाऱ्याची कुट्टी केली .

. 2. ताडपत्री वरती कुट्टी टाकली.

. 3. ती पसरून घेतली व आधी केलेलं गुळाच पाणी व मिठाचे पाणी त्यावर शिंपडले .

. 4. नंतर उरलेली कुट्टी परत त्यावर पसरून परत पाणी शिंपडले.

. 5. ही कुट्टी एका पिशवीत बंद करून ठेवायची .

. 6. अश्या प्रकारे 10 kg चाऱ्या वरती प्रक्रिया केली .

कीड लागलेल्या झाडांच्या पानांचे नमुने गोळा करणे

उद्देश :- पानांवरच्या किडी ओळखण्यास शिकणे.

वांगी :- लक्षण — फळाला होल पडले आहे, फळ कापल्यावर अळी दिसत आहे.

किड :- फळ पोखरणारी अळी

यासाठी आम्ही पेरूची, मिरची, वांगी, मका, चवळी, पालक, यांचे नमुने आणून बघितले व त्यावरच्या अळी व रोग पहिले.

पान पालक :- पानावर पांढरे चट्टे व खडबडीत होते. म्हणजे या पानावर रस शोषण करणाऱ्या अळी होत्या.

rs शोषण करणाऱ्या किडी :- या प्रकारच्या किडी पानांवर बसून मधील रस शोसून घेतात. रस शोषलेला भाग खडबडीत किव्हा चेहऱ्यावर घामोळ्या आल्यासारख्या दिसतो. उदा., तुडतुडे, मावा, पांढरी माशी, कोळी

 1. पेरूची पान :- चांगले पाने ही दोन्ही साईडून प्लेन दिसले व खडबडीत नव्हते. खराब पाने त्यावर दोन्ही साईडून खडबडीत होते व पांढरे टिपके होते त्या पांढऱ्या ठिपक्यांना लोकरी मावा रोग म्हणतात. त्या पानांना हा रोग झाला होता.
 2. सुभाबळ :- ही पाने मागे चिकट झाली होती यात चिकट साधा मावा हा रस शोषणारी किड होती त्यावर ही अळी होती.

अनुभव :- पांनावरील किडी ओळखण्यास व त्यावरील रोग ओळखण्यास शिकलो. या किडी पांनावर होल पाडतात. व फळांवर सुद्धा पांढरे व काळे ठिपके असले तर मावा रोग असतो.

.

फवारणीचे द्रावण तयार करणे

उद्देश :- फवारणीचे द्रावण तयार करण्यास व त्याचे प्रमाण ओळखण्यास व द्रावण बनवण्यास शिकणे.

साहित्य :- पंप, औषध, पाणी, मास्क, हॅन्डग्लोज

कृती :-

 1. सर्वप्रथम पंप भरपूर पाण्याने धुतला.
 2. नंतर नोझल साफ करून पाणी व्यवस्थित फवारते का ते चेक केले.
 3. नंतर 3 लिटर पाण्यात निम ऑइल Azadriachin हे औषध 30 ml टाकले. व त्यामध्ये मायक्रो न्यूट्रिन ही powder टाकली 25 gm.
 4. पंपात 15 लिटर पाणी भरले. व मास्क घातला.
 5. व पेरूच्या बागेला खालच्या प्लॉटला, चवळीला, मिरची, वांगी यांना फवारणी केली.
 6. जास्त उन्हात फवारणी केल्याने उपयोग होत नाही.

प्रमाण :- 1लिटरला 2ml निम ऑइल ( Azadriachin )

15 लिटर पाण्यामध्ये 25 gm ( मायक्रो न्यूट्रिन powder )

हे द्रावण पेरूच्या झाडांना फवारले होते. कारण त्यांना लोकरी मावा किड व रोग असल्यामुळे फवारले.

चवळीच्या पांनावर काळे ठिपके होते. म्हणजे त्या पानांना काळा मावा हा रोग होता व त्यावर पाने पोखरणारी अळी लागली होती. म्हणून त्यावर निम ऑइल या औषधाचे द्रावण करून फवारणी केली होती.

दुधामधील भेसळ ओळखणे

उद्देश :- दुधामधील भेसळ ओळखण्यास शिकणे.

साहित्य :- दूध, पाणी

कृती :-

 1. सर्वप्रथम आम्ही थोडेसे दूध व पाणी घेतले.
 2. नंतर एका बाजूला पाणी मिक्स केलेले दूध घेतले व एका बाजूला न पाणी मिक्स केलेल्या दुधाचा एक थेंब हातावर टाकला. व त्याचे निरीक्षण केले. तो थेंब खूप हळूहळू खाली सरकत होता.
 3. त्यानंतर पाणी मिक्स केलेल्या दुधाचा एक थेंब हातावर टाकला. व त्याचे सुद्धा निरीक्षण केले. तो थेंब लवकर खाली सरकला जात होता. व त्याचा रंग फिकट पांढरट झाला होता.

अनुभव :- आपल्या घरी काही मशीन केमिकल नसले तरी आपल्याला दुधातील भेसळ ओळखता येते. यामध्ये फरशीवर किंवा काचेच्या प्लेटवर सुद्धा अशा प्रकारे घरी करता येते. व दुधाची पिशवी रिपेरिंग कशी ओळखण्याची पद्धत तिच्या काठावरून हात फिरवायचा जर हाताला करवतेच्या दातासारखे लागले तर दूध पिशवी रिपेरिंग केली नाही. ती कंपनीत पॅकिंग आहे. व जर करवतीच्या दातासारखे लागले नाही तर ती रिपॅकिंग केली आहे. नक्कीच त्यात काहीतरी भेसळ केली असावी. भेसळ केलेले दूध फिक्कट पांढऱ्या रंगाचे असते. व भेसळ न केलेले दूध गडद पांढऱ्या रंगाचे असते.

बियाणांची उगवण क्षमता

उद्देश :- बिया उगवण्याच्या क्षमता बघण्यास शिकणे.

साहित्य :- पाणी, बिया, वाटी

कृती :-

 1. सर्वप्रथम साहित्य गोळा केले.
 2. प्रॅक्टिकलसाठी आम्ही शिल्लक राहिलेले धन्याच्या बिया घेण्यास ठरवले व आणले.
 3. कळण्यासाठी 2 पद्धती मधला फरक आम्ही 100 बिया एका प्लेटमध्ये घेतल्या व 100 बिया बुडतील एवढ्या पाण्यात वाटीमध्ये ठेवल्या.
 4. व त्या बिया 3 तास भिजवत ठेवल्या.
 5. त्यामधील चांगले बी तरंगले nahi
 6. व खराब बी तरंगायला लागले.
 7. त्यावरून समजले कि बिया उगवतील.
 8. व त्यावरून त्यांची उगवण्याची क्षमता समजली.

उगवण्याची क्षमता :-

सूत्र = उगवणे क्षमता = मोड आलेले बिया ÷ एकूण बिया × 100

अनुभव :- यामध्ये बिया उगवण्याची क्षमता समजते व त्यावरून आपल्या किती बिया उगवणार हे समजते. त्यावरून शेतकऱ्यालाही नुकसान होऊ नये असा एक फायदाही आहे. हा या साठी समजा आपण पॅकेट घेतल्यावर आपण त्याचे वाचन करता किव्हा ज्याला इंग्रजी वाचता येत nasel तर त्यांनी बिया किती उगवणार हे बघण्यासाठी साधा घरगुती उपाय आहे. त्यामुळे बियाणे पॅकेट वर दिलेल्या बिया उगवण्याच्या क्षमतेनुसार तेवढ्या बियाने उगवली नाहीतर ते पॅकेट कंपनी परत करून आपल्याला आपले दुसरे बियाणे बदलून मिळते.

बिजप्रक्रिया करणे

उद्देश :- बिजप्रक्रिया करण्यास शिकणे.

बिजप्रक्रिया म्हणजे बिज लावण्या आधी बियांवर केलेली प्रक्रिया म्हणजे बिज प्रक्रिया होय.

साहित्य :- पाणी, मीठ, बिया, भांडे इ.

कृती :- जसे कि कुठलेही बियाणे घेताना बघून घ्यावी. समजा सोयाबीन बियाणे घेतले तर त्या वरील वजन, किंमत वॅलेडीटी, त्या बीयांची अनुवांशिक शुद्धता कीती टक्के आहे. त्या बियांमधील कीती टक्के बिया उगवतात ते बघणे. व शाररिक शुद्धता किती टक्के बघणे, पॅकेटवर हे लिहले असते. मग त्यावरून समजते कि आपल्या किती बिया उगवतात. लावल्यावर तेवढ्या बिया नाही उगावल्या तर त्या परत करता येते. कंपनीला Complete करता येते.

भौतिक पद्धत :- म्हणजे केमिकल वापरलेले बी होय.

30 gm मीठ 1 लिटर पाण्यात या प्रमाणे 300 gm मीठ 10 लिटर पाण्यात द्रावण तयार करून घेणे तयार केलेल्या द्रावनात बियाणे 8-10 मिनिटे बुडवून ठेवावे बियाणे ढवळावे वरखाली

टीप :- पाण्याचे वरती तरंगलेले बिया खराब असते जसे कीड लागले, अर्ध तुटलेले, वजन कमी असलेले ते बाजूला काढावे ते बी उगवत नाही.

अरबट हा रोग असतो तर ज्वारी व बाजरी बियानात ही प्रक्रिया केली जाते.

प्राण्यांचे तापमान चेक करणे

उद्देश :- प्राण्यांचे तापमान चेक करण्यास शिकणे.

साहित्य :- थर्मामीटर

कोणत्याही प्राण्यांचे body tempretere normal 102° च्या कमी असते. जर 102° पेक्षा जास्त असेल तर त्या प्राण्याला ताप असतो.

ताप आला कि नाही हे आपण प्राणी खात आहे कि नाही यावरूनही पाहू शकतो. आम्ही येथील गाईचे तापमान चेक केले.

 1. गौरी — 100.6°
 2. सोनम — 100.9°
 3. मोठी काळी शेळी — 101.9°
 4. छोटी काळी शेळी — 102.1°

शेळीच्या वजणावरून तिचे खादय काढणे.

उद्देश :- शेळीच्या वजणावरून तिचे खादय काढण्यास शिकणे.

खादय :- 1.5 kg सुखाचारा :- 300 gm

DM :- पाण्याचे प्रमाण शून्य

कलम पद्धतीचा अभ्यास करणे

उद्देश :- एखाद्या वाया गेलेल्या झाडाला कलम करण्यास शिकणे.

वनस्पतींना कलम करण्याच्या पद्धती :- 1) पाचर कलम 2) गुट्टी कलम

 1. पाचर कलम :- आंबा, पेरू व इतर कोणत्याही झाडाला करता येते. या मध्ये एक मूळ असलेले झाड व एक फांदी घ्यायची. दोन्ही फांदयाची पाने काढावी. फांदया समान आकाराच्या असाव्या. पाचर कलम मध्ये एक फांदी सरळ एक भेगीसारखी कापावी. व एक पाचारीच्या आकारासारखी करावी व एकत्र लावून वरून चिकटटेपने पॅक करून घ्यावे. ज्यामुळे त्यात पाणी, हवा जाणार नाही व चिकटटेपच्या वर दोरीने बांधावे. दोन्ही झाडे एकाच फॅमिली ( जात ) असणे आवश्यक आहे.
 2. गुट्टी कलम :- या कलम मध्ये फांदीची पाने काढून जिथे डोळा आहे. तिथे अर्धा इंचाची गोल साल काढून त्यावर mos ( शेवाळ ) किव्हा सुतळी मोकळी करून व ओली करून बांधावी. वरून प्लास्टिकने पॅक बांधावे. व दोरीने आवळून घ्यावे. त्यामुळे त्याला हवा व पाणी लाग

उद्देश :- एखाद्या वाया गेलेल्या झाडाला कलम करण्यास शिकणे.

वनस्पतींना कलम करण्याच्या पद्धती :- 1) पाचर कलम 2) गुट्टी कलम

 1. पाचर कलम :- आंबा, पेरू व इतर कोणत्याही झाडाला करता येते. या मध्ये एक मूळ असलेले झाड व एक फांदी घ्यायची. दोन्ही फांदयाची पाने काढावी. फांदया समान आकाराच्या असाव्या. पाचर कलम मध्ये एक फांदी सरळ एक भेगीसारखी कापावी. व एक पाचारीच्या आकारासारखी करावी व एकत्र लावून वरून चिकटटेपने पॅक करून घ्यावे. ज्यामुळे त्यात पाणी, हवा जाणार नाही व चिकटटेपच्या वर दोरीने बांधावे. दोन्ही झाडे एकाच फॅमिली ( जात ) असणे आवश्यक आहे.
 2. गुट्टी कलम :- या कलम मध्ये फांदीची पाने काढून जिथे डोळा आहे. तिथे अर्धा इंचाची गोल साल काढून त्यावर mos ( शेवाळ ) किव्हा सुतळी मोकळी करून व ओली करून बांधावी. वरून प्लास्टिकने पॅक बांधावे. व दोरीने आवळून घ्यावे. त्यामुळे त्याला हवा व पाणी लाग

शेतातील तण नियंत्रण

उद्देश :- शेतातील तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करणे .

व्याख्या :- आपण शेतामद्धे न लावलेले व आपल्याला नको असलेले गवत म्हणजेच तण होय .

साहित्य :-

नुकसान :- किडींचा प्रभाव वाढतो , पिक लागवडीचा खर्च वाढतो , पाणी वायला जाते , हवा खेळती राहत नाही व त्यांमध्ये प्रकाश आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होते .

तन नियंत्रण करण्याच्या पद्धती :-

1) भौतिक पद्धत :-

a) जमीन ओली असताना हाताच्या साह्याने गवत उपटून काढणे.

b) खुरप्याच्या साह्याने गवत काढणे.

c) जमिनीची खोल नांगरट करावी.

2) रासायनिक पद्धत :-

A) विशिष्ट रसायनांच्या मदतीने त्यांना आमचे नियंत्रण केले जाते उदाहरणार्थ :- 24d, ग्लायफोसेट.

b) प्रसंगांचा वापर दोन पद्धतीने केला जातो.

1) सिलेक्टिव्ह

2) नॉन- सिलेक्टिव्ह

पेरणीपूर्वी :- उदा :- सोयाबीन शेती करताना पेरणी बरोबर जमिनीत चांगली ओल असताना व्हेअर लॉटे ,trifaulralin. पेरणी च्या फवारले जाते.

कॉन्टॅक्ट : vd साईड ( संपर्कजन्य तन नाशक) :- तन नाशक फवारताना दुसऱ्या झाडावर फवारणी केल्यास ती झाडे किंवा रोपे मारली जातात.

उदा :- प्यारो कोट, डायक्‍लोराईड.

तणनाशक फवारता ना घ्यायची काळजी :-

1) जमिनीत चांगली ओल असावी.

2) फवारणीचा पंप चांगल्या प्रकारे धुवून घ्यावा.

3) एकाच ठिकाणी जास्त वेळ फवारू नये.

4) तोंडाला मास्क बांधावा.