1 . हायड्रोपोनिक्स तयार करणे 

उद्देश . हायड्रोपोनिक्स तयार करणे 

साहित्य . pvc पाईप, हायड्रोपोनिक्स कप ,नारळाच्या शेंड्या, कोको पीठ ,ट्रायकोडर्मा पावडर ,पाणी, बदली,बियाणे 

कृती .1. १५ लिटर पाण्यात १५ ग्रॅम ट्रायोकोडर्मा पावडर टाकली 

2.नंतर कोको पीठ पाण्यात टाकले १५मिनिट त्याला ठेवले

3.नंतर कोको पिठातून पाणी दाबून पाणी काढले व कोको पीठ कोरडे केले

4.कपात नारळाच्या शेंड्या सोलून टाकल्या व कोको पीठ कपमध्ये टाकले व बी कपमध्ये टाकले 

वरून परत कोको पीठ टाकले 

निरीक्षण . ६दिवसानंतर कोम फुटले

काळजी एका  कपमध्ये २,३ बी टाकावे जास्त नाही 

कोम आल्यानंतर प्रेशरने पाणी टाकू नये 

2. औषध फवारणी 

उद्देश :पिकावरच्या  रोगावर उपाय करणे 

साहित्य :पंप ,औषधें ,पाणी 

दक्षता :१.  औषध मारताना तोंडाला मास्क लावणे 

          २.हातात हातमोजे घालणे 

          ३. पायात बूट घालणे 

          ४.औषध  मारल्यानंतर कपडे बदलणे 

कृती :१.पंपात पाणी भरणे 

        २. प्रमाणानुसार  औषद पाण्यात टाकणे   

        ३.पाण्यात औषध मिक्स करणे 

        ४.औषध मारणे 

3.बीज प्रक्रिया 

उद्देश : बीज प्रक्रिया शिकणे 

साहित्य :ट्रायकोडर्मा पावडर ,बियाणे ,पेपर ,हातमोझे 

कृती : १. १०० ग्राम बियांसाठी १ ग्राम ट्रायकोडर्मा पावडर टाकावी . 

        २. १०० ग्राम बियांवर १ग्राम ट्रायकोडर्मा पावडर टाकली व हळुवार मिक्स केले . 

फायदे : १. बीज प्रक्रिया केल्यावर बियाला बुरशी लागत नाही . 

           २. बी खराब होत नाही . 

           ३. बी उगवण चांगली होते . 

            ४. बी जास्त काळ टिकतात 

4. टेरेस गार्डन 

उद्देश : टेरेस गार्डन शिकणे . 

साहित्य : माती ,बॅग ,बिया ;खते . 

कृती : १. टेरेस स्वच्छ करणे . 

         २. बॅग मध्ये निम्मी बॅग माती टाकणे . 

          ३. थोडे खत टाकणे . 

          ४. वरून माती टाकणे . 

          ५. . बी लावणे . 

           ६. रोज नियमित पाणी देणे . 

५ चिंचेच्या झाडाची लागवड

उद्देश :झाडे लावणे .

साहित्य :माती ,खत ,रोपट ,बॅग

कृती :१ माती आणणे व त्यातील मोठे दगडी काढणे .
२बॅगमध्ये माती भरायची अर्धी बॅग माती थोडे खत टाकायचे व त्यानंतर झाड त्या बॅगमध्ये ठेवायचे व वरून माती टाकायची व रोज पाणी दयायचे .
३पाणी कमी असल्यावर हि पद्धत वापरावी .
४पाणी असले तर रोप मातीतच गाडायचं .
५नंतर पाणी आल्यावर बॅगमध्ये लावलेलं झाड मातीत लावायचं .