मातीचा नमुना घेणेमातीचा चांगला प्रतिनिधिक नमुना घेणे हा मातीच्या विश्लेषण प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य निकाल मिळण्यासाठी नमुना शास्त्रीय पद्धतीने घेणे आवश्यक आहे.शेतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून नमुने घेऊन एकत्र करून मिश्र नमुना तयार करावा. नमुना घेताना वरचा थर काढून आतील माती घ्यावी.
मातीचा नमुना तपासणीस योग्य बनविणे
मातीचा नमुना घेतल्यानंतर त्याची प्रक्रिया करावी. नमुना सुकवून त्यातील खडे, कचरा काढून टाकावा.नंतर नमुना बारीक करून चाळणीतून गाळावा.
रंगमापक वापरण्याची पद्धतज्या घटकाचे परीक्षण करायचे आहे त्या घटकाचा रसायनासह नमुना तयार करावा.तो नमुना रंगमापक युनिटमध्ये ठेवावा.नंतर त्या नमुन्याचा रंग रंग तक्त्याशी जुळवावा.ज्या रंगाशी जुळेल त्या रंगाच्या प्रमाणानुसार निकाल ठरवावा.
किट वापरताना घ्यावयाची सूचना
टेस्ट बाटल्या स्वच्छ ठेवाव्यात.
रसायने सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
वापरल्यानंतर उपकरणे स्वच्छ धुवावीत.
किट लहान मुलांपासून दूर ठेवावी.
Colour Chart नीट वाचूनच निकाल नोंद करावा.


