.माती परीक्षणाचे फायदेयोग्य खतांचे प्रमाण ठरवता येते.
खतांचा खर्च कमी होतो.उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
मातीचे आरोग्य सुधारते.संतुलित खत व्यवस्थापन करता येते.
माती नमुना गोळा करणेनमुना गोळा करण्याची पद्धतशेतात झिगझॅक (Z किंवा W) पद्धतीने फिरून 10 ते 15 ठिकाणे निवडा.
प्रत्येक ठिकाणी पृष्ठभागावरील गवत, पालापाचोळा, दगड व कचरा काढून टाका.
फावड्याने V-आकाराचा खड्डा खणून साधारण 15–20 सेमी (6–8 इंच) खोलीपर्यंत माती घ्या.
खड्ड्याच्या मधल्या बाजूची सुमारे 2–3 सेमी जाडीची माती नमुना म्हणून घ्या.
सर्व ठिकाणांहून घेतलेली माती स्वच्छ प्लास्टिकच्या बादलीत एकत्र करून नीट मिसळा.
मिसळलेल्या मातीतून सुमारे 500 ग्रॅम माती वेगळी काढा.
नमुना स्वच्छपिशवीत भरून त्यावर खालील माहिती लिहा:शेतकऱ्याचे नावगावगट/सर्वे क्रमांकपीकनमुना घेतल्याची तारीखनमुना घेताना घ्यावयाची काळजीबांध, रस्ता, झाडाखालची जागा, खताचा ढीग किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणांहून नमुना घेऊ नका.नुकतेच खत टाकलेल्या जागेतील माती घेऊ नका.
वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीसाठी स्वतंत्र नमुने घ्या.
नमुना स्वच्छ साधनांनी आणि स्वच्छ पिशवीतच गोळा करा.
माती परीक्षणाचे फायदेयोग्य खतांचे प्रमाण निश्चित करता येते.उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता वाढते.खतांचा खर्च कमी होतो.
मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

