कॉम्पुटर आणि माझी दोस्ती गेम्स आणि ड्रॉईंग करताना झाली होती. मला ते कारायला खूप आवडायचं त्याच्या पहिले कडे गेलोच नव्हतो कधी मी इथे आल्यावर कॉम्प्युटर शिकायला मिळेल हे एकूण खूप आनंद झालं कारण मला ड्रॉईंग आणि गेम्स खेळायला मिळणार होत. असं मला वाटल होत. पण सर नी आमचे ग्रुप तयार केले आठवड्यातून एकदा जाणे असं सांगितलं. आणि मला त्या दिवसाची वाट बघायला लागायला लागलो मी फुडें काय शिकलो ते बघू म्ह त्या एका दिवसात.

मार्गदर्शन :- आरती मॅडम

1. कॉम्पुटर आणि त्याच्या भागाची नावे आणि माहिती थोडक्यात.

कॉम्प्युटर ला आपण मराठीत संगणक असं म्हणतो.

भागाची नावे :=

  • प्रोसेसर (CPU): संगणकाचे मेंदू. सर्व गणना आणि निर्देशांचे पालन करतो.
  • रॅम (RAM): संगणक ज्या डेटावर सध्या काम करत आहे ते पाहण्यासाठी एक तात्कालिक स्टोरेज स्पेस.
  • हार्ड डिस्कः संगणकाचा दीर्घकालीन स्टोरेज. सॉफ्टवेअर, फाईल्स, चित्रं इ. सर्व काही यात साठवले जाते.माउस आणि कीबोर्ड: संगणकाशी संवाद साधण्यासाठी वापरली जाणारी इनपुट उपकरणे.
  • मॉनिटरः संगणकाचा आउटपुट प्रदर्शित करतो.
  • ग्राफिक्स कार्डः संगणकाच्या दृश्य प्रदर्शनासाठी जबाबदार.
  • पावर सप्लाईः संगणकाच्या सर्व भागांना वीज पुरवते.

1 ) मॉनिटर :

की-बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला “मॉनिटर” असे म्हणतात.

2) की-बोर्ड (Keyboard):-

की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे. की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते.संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो.

3) फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive):-

फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive) संगणकाच्या CPU मध्ये बसवलेला असतो ह्याचा पुढील भाग ज्या मधून फ्लोपी आत टाकली जाते तो भाग CPU च्या पुढील भागातून दिसतो. त्या फ्लोपी ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज पॉवर वोल्टेज दिले जाते. मदर बोर्ड वरून फ्लोपीडिस्क केबल फ्लोपी ड्राइव ला संपर्कासाठी जोडलेली असते.

4) मदर बोर्ड (Motherboard:

मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे हृदय आहे. याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही म्हणतात. संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो.