विटांचा वापर करून योग्य पद्धतीने बांधकाम बॉण्ड तयार करणे.
साहित्य:
विटासिमेंटवाळूपाणीट्रॉवेलमापपट्टीस्पिरिट लेव्हलदोरी
कृती:
प्रथम आवश्यक साहित्य व अवजारे तयार करावीत.
सिमेंट व वाळू मिसळून योग्य प्रमाणात मसाला तयार करावा.
विटा पाण्यात भिजवून घ्याव्यात.
प्रथम विटांची रांग सरळ रेषेत लावावी.
विटांच्या मध्ये समान जाडीचा मसाला लावावा.
पुढील रांगेतील विटांचे सांधे मागील रांगेतील सांध्यावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.दोरी व स्पिरिट लेव्हलच्या साहाय्याने बांधकाम सरळ व पातळीत आहे का ते तपासावे.अशा प्रकारे आवश्यक उंचीपर्यंत बॉण्ड तयार करावा.
इंग्लिश बॉण्ड (English Bond)
फ्लेमिश बॉण्ड (Flemish Bond)
हेडर बॉण्ड (Header Bond)
स्टेचर बॉण्ड (Stretcher Bond)
रॅट-ट्रॅप बॉण्ड (Rat-trap Bond)