वायर म्हणजे काय ?

  • वायर म्हणजे विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी वापरला जाणारा विद्युत वाहक होय.
  • वायर सामान्यतः तांबे किंवा ॲल्युमिनियमपासून बनवले जातात. वायरवर विद्युत धक्का टाळण्यासाठी इन्सुलेशन केलेले असते.

वायरचे प्रकार :

1. सिंगल कोअर वायर (Single Core Wire): यामध्ये एकच वाहक असतो. घरातील विद्युत वायरिंगमध्ये वापर केला जातो.

2. मल्टी कोअर वायर (Multi Core Wire): यामध्ये दोन किंवा अधिक वाहक असतात. नियंत्रण परिपथ व विविध विद्युत जोडण्यांमध्ये वापरतात.

3. फ्लेक्सिबल वायर (Flexible Wire): अनेक बारीक तांब्याच्या तारा एकत्र करून बनवलेली असते. ही सहज वाकवता येते. उपकरणे व लवचिक जोडण्यांसाठी वापरतात.

4. पीव्हीसी वायर (PVC Wire): या वायरवर PVC प्लास्टिकचे इन्सुलेशन असते. घरगुती व औद्योगिक वायरिंगमध्ये वापरतात.

5. रबर वायर (Rubber Wire): रबरचे इन्सुलेशन असलेली वायर. लवचिकता आवश्यक असलेल्या काही विद्युत उपकरणांमध्ये वापरतात.

वायरचे फायदे :

  • विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी उपयोगी.विद्युत उपकरणांना वीज पुरवठा करता येतो.योग्य इन्सुलेशनमुळे विद्युत धक्क्याचा धोका कमी होतो.
  • विविध आकार व क्षमतेमध्ये उपलब्ध असतात.घरगुती, औद्योगिक व शेतीच्या विद्युत कामांमध्ये उपयोग होतो.

प्रक्रिया (Process) :

  • प्रथम आवश्यक साहित्य गोळा केले.
  • विविध प्रकारच्या वायरचे निरीक्षण केले.
  • वायरचे बाहेरील इन्सुलेशन व आतील वाहक पाहिला.
  • वायरचे प्रकार व त्यांचे उपयोग समजून घेतले.
  • योग्य वायरची निवड कशी करावी याची माहिती घेतली.
  • सर्व माहिती प्रात्यक्षिक वहीत लिहिली.