विज बिल ची माहिती :
- वीज बिल म्हणजे आपण वापरलेल्या विद्युत ऊर्जेचे वीज वितरण कंपनीला द्यावे लागणारे बिल होय. घरातील पंखा, बल्ब, टीव्ही, फ्रिज इत्यादी उपकरणांमुळे वीज वापरली जाते. या विजेचा वापर युनिट (kWh) मध्ये मोजला जातो.
- वीज बिल काढताना मीटर रीडिंग, वापरलेले युनिट, प्रति युनिट दर, फिक्स चार्ज व इतर लागू शुल्क यांचा विचार केला जातो.
वीज बिलातील महत्त्वाचे घटक :
- मीटर रीडिंग: मीटरवर दिसणारी एकूण वीज वापराची नोंद.
- युनिट (Unit): विद्युत ऊर्जेचे मोजमाप. 1 युनिट = 1 kWh.
- युनिट चार्ज: वापरलेल्या विजेच्या युनिटनुसार आकारले जाणारे शुल्क.
- फिक्स चार्ज: वीज जोडणीसाठी आकारले जाणारे ठराविक शुल्क.
- वीज बिलाची एकूण रक्कम: सर्व लागू शुल्कांची बेरीज.
आवश्यक साहित्य व अवजारे
- वीज मीटर
- कॅल्क्युलेटर
- वीज बिलाचा नमुना
- पेन व वही
प्रक्रिया (Process) :
- सर्वप्रथम वीज मीटरचे मागील व सध्याचे रीडिंग घेतले.
- सध्याच्या रीडिंगमधून मागील रीडिंग वजा केले.
- वापरलेले एकूण युनिट मिळवले.
- वापरलेल्या युनिटनुसार युनिट चार्ज काढला.
- त्यामध्ये फिक्स चार्ज व इतर लागू शुल्कांची बेरीज केली.
- बिलाची एकूण रक्कम काढली.
- कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने बिलाची रक्कम तपासली.
सूत्र :
- वापरलेले युनिट = सध्याचे मीटर रीडिंग − मागील मीटर रीडिंग
- एकूण वीज बिल = युनिट चार्ज + फिक्स चार्ज + इतर लागू शुल्क
Unit & Rupees :
(युनिट) Rupees (₹ प्रति युनिट)
1 – 100 ₹3.96
101 – 300 ₹10.80
301 – 500 ₹15.03
501 – 1000 ₹17.53
1000 पेक्षा जास्त ₹17.53
