सत्र 1: फोटोग्राफी

दि. १२ जुलै २०२०: DBRT च्या पहिल्या सत्राचा उद्देश नवीन मुलांशी ओळख करून घेण्याचा व त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त गृहपाठ देणे हा होता, म्हणून इंजिनिअरींग विभागाचे पहिले सत्र फोटोग्राफी या विषयावर घेतले गेले. या सत्रामध्ये मुलांना फोटोग्राफी चा इतिहास थोडक्यात सांगण्यात आला तसेच मोबाईल फोटोग्राफी सुधारण्यासाठीच्या काही सूचना देण्यात आल्या. गृहपाठ म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूचे फोटो काढायला सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1AzIAfGjbPyFAX-IZ16FIjqRWtW0o79H7/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1MOyHw7cToXCN1tD1LHw4J2ZkCUwPMiHO?usp=sharing

सत्र 2: सिम्पल मशीन्स

दि.१५ जुलै २०२०: दुसर्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सिम्पल मशीन्स बद्दल माहिती देण्यात आली. सिम्पल मशीन म्हणजे काय व त्या कशाप्रकारे कार्य करतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी सायकल मधील विविध सिम्पल मशीन्सचा आधार घेण्यात आला. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूला कोणकोणत्या सिम्पल मशीन्स आहेत ते शोधण्याचा व त्यांचे फोटो काढण्याचा गृहपाठ देण्यात आला.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1ZwHmspSXZ-paUEwBDY1CPRCdJwVYGdDG/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1rSd8guA4ikmVrGz3mjOAncPTKifUAHO9?usp=sharing

सत्र 3: DBRT प्रकल्प

दि. १९ जुलै २०२०: ह्या सत्रा मध्ये विद्यर्थ्यांना DBRT चे विद्यार्थी कशाप्रकारे प्रकल्प करतात याची माहिती देण्यात आली. यात मागच्या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गेट च्या प्रकल्पाचे उदाहरण देण्यात आले. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील गेट्स ची पाहणी करण्यास सांगण्यात आले व त्या गेट च्या डिजाईन मागील उद्देश काय असेल याचा विचार करण्यास सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1Rg1aRFqsqdwny4Th1ByfYJxsg05et7rK/view?usp=sharing

सत्र 4: मापन

दि. १२ ऑगस्ट२०२०: सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मापन ह्या विषयी माहिती देण्यात आली. यात मापनाचा इतिहास, मापनाचे विविध प्रकार यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना त्यांचे वजन व उंची मोजण्यास सांगण्यात आले व एका मापनाच्या पद्धती तून दुसर्या पद्धती मध्ये परावर्तीत करण्यास सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1qjpE15mmKAtwaiIEI9DDqx3-xt11vhuj/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद :

https://drive.google.com/drive/folders/1s9bCNy08JB7XQkl15IkB2356RkxRDfL-?usp=sharing

सत्र 5: भौतिकशास्त्रातील मुलभूत संकल्पना

दि. १४ ऑगस्ट २०२०: सत्रामध्ये विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्रातील वजन, वस्तुमान, गती, वेग, बल, कार्य, शक्ती इत्यादी संकल्पना शिकवण्यात आल्या. विद्यार्थ्यांना स्वतःची शक्ती मोजण्यास सांगण्यात आले तसेच दोन सारख्या आकाराच्या बाटल्या ज्यातील एक पूर्णपणे भरलेली व दुसरी अर्धी भरलेली समान उंचीवरून सोडून त्याचे निरीक्षण करण्यास सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1s8kfAp2NSCVvab_ltU02n-i98CLmWUNY/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1tiG5MP-mijP8YMTYqgg32nHiSLFi6vsT?usp=sharing

सत्र 6:विनिर्माण प्रक्रिया

दि.१६ सप्टेंबर २०२०: सत्रामध्ये विद्यार्थ्यांना उत्पादनाच्या 4 पद्धती – कास्टिंग आणि मोल्डिंग, फॉरमिंग, जॉयनिंग, मशिनिंग यांबद्दल माहिती देण्यात आली तसेच या उत्पादन पद्धतींचा वापर करून बनवल्या जाणार्या उत्पादनांची उदाहरणे देण्यात आली. असाइनमेंट म्हणून मुलांना त्यांच्या उपयोगात येईल अशी एखादी छोटीशी वस्तू बनवण्यास सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1awZiLqzV9Snu-CqzbDE9EOjqMcguNrrb/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/16NNGhr6WArEIPYvRQT22azGrjFHCW9s7?usp=sharing

सत्र ७: सुतारकामाची ओळख

दि. १८ सप्टेंबर २०२०: ह्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सुतारकामाची ओळख करून देण्यात आली. सुतारकामासाठी वापरात येणाऱ्या लाकडाचे वर्गीकरण कसे केले जाते तसेच त्यांची उदाहरणे सांगण्यात आली. सुतारकाम करताना वापरात येणार्या उपकरणांची माहिती तसेच ते हाताळताना घ्यायची काळजी यांची माहिती देण्यात आली. सनमायका चीटकवण्याची पद्धत सुद्धा सांगण्यात आली.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1_txjw8WS9iLwZJhF82Nt3IKv2IByYUGR/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1Dc8RZ-neQ6df4jgZGYzRahvSKKG5M_lO?usp=sharing

सत्र ८ : फ्लोचार्ट आणि कॉस्टिंग

दि. २० सप्टेंबर २०२०: ह्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना फ्लोचार्ट चे २ प्रकार आणि ते तयार करण्याची पद्धत शिकवण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे कॉस्टिंग कशाप्रकारे काढायचे याची माहिती देण्यात आली.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1kZor7LxjOffVg_xCe2ryCvFksVwse4gQ/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1F-6Iv7HCrusSZdbfzxDSsYPudSgrUUIt?usp=sharing

सत्र ९: बांधकाम साहित्याची ओळख

दि. १४ ऑक्टोबर २०२०: ह्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सिमेंट,वाळू, खडी, वीट या बांधकाम साहित्याची ओळख करून देण्यात आली तसेच त्यांचे बांधकामातील महत्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना विटांच्या विविध रचनांची ओळख करून देण्यात आली आणि त्यांना आपल्या परिसरातील बांधकामात वापरण्यात आलेली विटांची रचना ओळखण्यास सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1mT423pdukuS0APbmsaCXze6o9ZLNBLAz/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1FwzAbINbrsWbYMtxf6nhma1L0DCxWZKa?usp=sharing

सत्र १०: फेरोसिमेंट

दि. १६ ऑक्टोबर २०२०: ह्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना फेरो सिमेंट बद्दल माहिती देण्यात आली. यात फेरोसिमेंट चा इतिहास , फेरोसिमेंट शीट ची निर्मिती व क्युरिंग इत्यादींचा समावेश होता. विद्यार्थ्यांना पेपर क्रेट पासून किंवा मोर्टार पासून वीट अथवा एखादी कामाची वस्तू तयार करण्यास सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1lrDNTuzDxbewf-P-SOQXdc0xNvY3wTtI/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद :

https://drive.google.com/drive/folders/1GWbnRE0SKi9UUnbo9U5gCOLJtzCgqiaf?usp=sharing

सत्र १०: RCC

दि:18 ऑक्टोबर 2020 :- या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना लोड बेरिंग व RCC बांधकाम मधील फरक, RCC बांधकामाचे फायदे तसेच RCC कॉलम बनवण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना RCC कॉलम बनवणे शक्य नसल्याने त्यांना त्यांच्या घरातील किंवा परिसरातील प्लास्टरिंग अथवा तत्सम दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात आले.

सत्राची PPT:

https://drive.google.com/file/d/1dn3yAnIFtvDNv41WN18Pb6NHismUHAMZ/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:

https://drive.google.com/drive/folders/1GyyRk2G4V6iXxG7YHMA9Mte2-gvB3fSQ?usp=sharing