प्रस्तावना :
बीटरूट हलवा हा पौष्टिक, आकर्षक रंगाचा आणि चविष्ट गोड पदार्थ आहे. बीटरूटमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. इन्स्टंट पद्धतीमुळे हा हलवा कमी वेळेत आणि सोप्या प्रकारे तयार करता येतो.

उद्देश :
कमी वेळेत व सोप्या पद्धतीने इन्स्टंट बीटरूट हलवा तयार करणे.

साहित्य :

  • बीटरूट – 22किलो
  • milk poweder -150 gm
  • दूध – 9 ली.
  • तूप – 1५० ग्रॅम
  • वेलची पूड – १5 gm
  • ड्रायफ्रुट (काजू, बदाम) – 340 ग्रॅम

कृती :
१. बीटरूट स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यावे.
२. कढईत तूप गरम करून त्यात किसलेले बीटरूट परतावे.
३. त्यात दूध घालून मध्यम आचेवर शिजवावे.
४. दूध आतेपर्यंत ढवळावे.
५. मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पूड घालावे.

यातून काय शिकलो :

  • साहित्य योग्य प्रमाणात वापरण्याचे महत्त्व समजले.
  • स्वच्छता व वेळेचे नियोजन शिकता आले.
  • इन्स्टंट पद्धतीने पौष्टिक पदार्थ लवकर तयार करता येतो हे समजले.

निष्कर्ष :
इन्स्टंट बीटरूट हलवा हा कमी वेळेत तयार होणारा, आकर्षक रंगाचा, चविष्ट आणि पौष्टिक गोड पदार्थ आहे. योग्य प्रमाण व पद्धत वापरल्यास उत्कृष्ट दर्जाचा हलवा तयार करता येतो.