स्वच्छताः 15-30 दिवसांनी धूळ, पाने आणि पक्ष्यांची विष्ठा मऊ कापड किंवा मऊ ब्रश व स्वच्छ पाण्याने साफ करावे लागतात. तारा आणि कनेक्शन तपासाः सैल, तुटलेल्या किंवा जळालेल्या वायर आहेत का ते पाहा. सावली टाळाः झाडांच्या फांद्या किंवा इतर वस्तूंमुळे पॅनलवर सावली पडत असल्यास ती दूर करा. इन्व्हर्टर तपासाः इन्व्हर्टरवर एरर किंवा लाल दिवा दिसत असल्यास तंत्रज्ञाशी संपर्क साधा. भेगा किंवा नुकसानः पॅनलच्या काचेवर तडे किंवा नुकसान दिसल्यास वापर सुरू ठेवण्याऐवजी करून घ्या. काळजी: गरम उन्हात थंड पाणी टाकू नये ऍसिड, डिटर्जंट किंवा कठीण ब्रश वापरू नका. छतावर काम करताना सुरक्षिततेची काम करावं लागतं.
