सौर पॅनेलची स्वच्छता: पॅनेलवर धूळ, माती किंवा कचरा साचल्यास सूर्याचा प्रकाश व्यवस्थित मिळत नाही. यामुळे ओल्या सुती कापडाने पॅनेल नियमित स्वच्छ ठेवावे.

बॅटरी निगा: बॅटरीचे वायर कनेक्शन घट्ट आहेत की नाही ते तपासावे. टर्मिनलवर गंज (Corrosion) चढला असल्यास तो स्वच्छ करावा

प्रकाश बल्बची सफाई: दिव्याची बाहेरील काच किंवा प्लास्टिक स्वच्छ ठेवावे, जेणेकरून प्रकाशाची तीव्रता कमी होणार नाही.

वायरिंगची तपासणी: सौर पॅनेलपासून बॅटरी आणि दिव्यापर्यंत जाणारी वायर कुठे कट झाली नाही ना, याची खात्री करावी.

सावलीपासून बचाव: सौर पॅनेलवर कोणत्याही झाडाची किंवा इमारतीची सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून बॅटरी पूर्ण चार्ज होईल.